…तोपर्यंत राज्यात लॉकडाऊन नाहीच; राजेश टोपेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्यात पुन्हा लॉकडाउन होऊ शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे.

आम्ही आधीच सांगितले आहे जो पर्यंत सातशे मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागत नाही तो पर्यंत लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नाहीत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. त्यामुळे जेव्हा सातशे मेट्रिक टन पेक्षा ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात निर्बंध लागू शकतात असे ते म्हणाले.

कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या तपासण्या वाढवाव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असेही राजेश टोपे यांनी म्हंटल.

Leave a Comment