कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत राजेश्वरी देवरे यांची मालपुर ग्रामपंचायतीला भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी राजेश्वरी देवरे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत साक्री तालुक्यातील मालपुर ग्रामपंचायतीला भेट दिली.

यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि सोबतच जमलेल्या लोकांना काही शासकीय योजनांची माहिती दिली.यावेळी ग्रामसेविका योगिता बच्छावं मालपुर गावातील प्रकाश काकुस्ते,तुषार भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश्वरी देवरे यांच्या या भेटीच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक सूरज चांदूरकर आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

राजेश्वरी देवरे यांनी या भेटी संदर्भात “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना सांगितले की “आजवरच्या शैक्षणिक वर्षात आम्ही जे शिकलो.ते प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन त्या ज्ञानाचा प्रसार करण्याची संधी मला कृषी कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत मिळाली याचा खूप आनंद होतो आहे.त्याच बरोबर भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम करायला आवडेल,असेही त्या म्हणाल्या.