व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘जेलर’साठी रजनीकांत यांनी घेतले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे मानधन; रक्कम ऐकूनच व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता रजनीकांत यांचा दाक्षिणात्य भागातच नाही तर संपूर्ण देशभरात एक मोठा चाहता वर्ग आहे. रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. त्यामुळेच आजवर त्यांचा एकही पिक्चर फ्लॉप ठरलेला नाही. आता त्यांच्या जेलर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. जेलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवताना दिसत आहे. जेलर या चित्रपटाने तब्बल 600 कोटी पेक्षा देखील जास्त गल्ला गोळा केला आहे. विशेष म्हणजे, जेलर चित्रपटासाठी रजनीकांत यांनी देखील मोठी रक्कम घेतली आहे. ज्यामुळे ते सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत.

जेलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवत असताना दुसरीकडे रजनीकांत यांच्या मानधनाची चर्चा रंगू लागली आहे. जेलर चित्रपटातसाठी रजनीकांत यांनी तब्बल 210 कोटी रुपये घेतले आहे. यापूर्वीच्या चित्रपटात त्यांनी 110 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. परंतु आता त्यांनी या मानधनाची किंमत वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे रजनीकांत यांना 210 कोटी मानधनासोबत एक BMW X7 कार देखील भेटवस्तू म्हणून देण्यात आली आहे. या कारणाने रजनीकांत सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत.

रजनीकांत यांनी किती मानधन घेतले याची माहिती एनालिस्ट मनोबाला विजयाबालन यांनी ट्विट करून दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी कलानिधि मारन आणि रजनीकांत यांचे फोटो शेअर केले आहेत. रजनीकांत यांनी घेतलेले मानधन ऐकूनच सर्वांना धक्का बसला आहे. आता एनालिस्ट यांच्या ट्विटवर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. आजवर कोणत्याच अभिनेत्याला एवढे मानधन देण्यात आलेले नाही. परंतु रजनीकांत यांची प्रसिद्धी आणि काम पाहून त्यांना 210 कोटी मानधन देण्यात आले आहे.