लडकी नहीं देखी अंकल..? टुकूर टुकूर बघणाऱ्या काकांचा राखीने घेतला क्लास; व्हिडीओ झाला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत लॉकडाऊन काळात या ना त्या कारणामुले वारंवार चर्चेत आहे. कधी पीपीई घालून भाजी खरेदी करते. तर कधी वाद विसरून मिका सिंगला भररस्त्यात मिठी मारते. तर कधी चित्रपटाचे प्रमोशनही करते. अशी मुंबईच्या रस्त्यावर राखी काहीही करताना दिसली की, फोटोग्राफेर्सचे कॅमेरा आपोआपच तिच्याभोवती गराडा घालतात. मग काय..? राखी काहीतरी बडबडते आणि पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत येते. आताही तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत काय तर राखी चक्क एका ‘अंकल’चा क्लास घेताना दिसतेय.

https://www.instagram.com/p/CPvNCcLpATo/?utm_source=ig_web_copy_link

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत राखी पेपराझींसोबत बोलत असताना एक व्यक्ति आपल्याकडे एकटक बघत असल्याचे राखीच्या लक्षात येते. ती व्यक्ती सतत आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर राखी सावंत बोलली नाही तर कास काय चालेल. मग आता यावर राखी तर बोलणारच. अगदी अपेक्षेप्रमाणे राखी बोललीच. राखी बोलली कि, ‘अंकल, आप जाओ ना, मैं इंटरव्ह्यू कर रही हूं. आप क्यों देख रहे हो? लडकी नहीं देखी अंकल?,’ असे म्हणत तिने अंकाचा चांगलाच क्लास लगावला. त्यानंतर अंकलही कमी नाही. त्यांनीही राखीला उत्तर दिले.

https://www.instagram.com/p/CPGcSE0NsS0/?utm_source=ig_web_copy_link

मुख्य बाब अशी कि त्यानंतर ते काका तिथून दुचाकी घेऊन निघाले खर. पण राखी त्यावरही कमेंट करते. जाओ ना, देखो उधर अ‍ॅक्सिडेंट हो जाएगा, असे तीने म्हटले. यावर अंकलनेही राखीला उत्तर दिले, कि आपको देखके आदमी ऐसेही मर जायेगा. अर्थात व्हिडिओत असा स्पष्ट आवाज येत नसला तरी पेपराझींनी याबद्दल सांगितले आहे. या उत्तरानंतरही वरून राखी म्हणाली कि, तो मला बघतोय…,माझ्या कॉस्च्युमला बघतोय.. आणि त्या तिथून बस येतेय आणि गाड्या येत आहेत.. या व्हिडीओत राखी काही चाहत्यांना सेल्फी देतानाही दिसते. voomplaने हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आयडीवर शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे राखीचा हा व्हिडीओ देखील चांगलाच वायरल होत आहे.

Leave a Comment