मैं पानी पानी हो गयी.! राखी सावंतचा नवा लूक आणि नवा ड्रामा; व्हिडीओ झाला वायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री राखी सावंत म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एकतर ड्रामाक्वीन आणि महत्बवाच म्हणजे कॉंट्रोव्हर्सी मेकर. ती कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी गायब झालेली राखी आजकाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे रोज नवे ड्रामी आणि नवे व्हिडीओ जोरदार वायरल होत असतात. कारण ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा काहीही नेम नाही. यावेळी तर तिच्या हटके आणि बोल्ड लूकने तिच्या चाहत्यांना भुरळच घातली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गजतोय. यात फोटोग्राफर्सला पोझ देताना अचानक पाऊस आल्यामुळे राखी भिजू लागली आणि नखरे करत करत पानी पानी हो गयी बोलत गाडीत बसली.

नेहमीप्रमाणे अनोख्या ढंगात आणि कॉमेडी अंदाजात राखीने पुन्हा एकदा चाहत्यांना आणि मीडिया फोटोग्राफर्सला हसवले. दुसरीकडे मात्र ती पुन्हा एकदा अनेकांच्या ट्रोलिंगच्या निशाण्यावर दिसली. अनेक नेटकरी तिला सोशल मीडियावर तिच्या कपड्यांवरून प्रचंड ट्रोल करत आहेत. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांवर अनेकांना आक्षेप आहे. राखीचे कपडे पाहून आम्हीच आमचे डोळे शरमेने खाली केले अश्या आशयाच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर उमटत आहेत. तर काहींनी नेहमीप्रमाणे तिचा ड्रामा पाहून कौतुकही केले आहे. तर काहींनी तिच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसवरून तिच्यावर टीकेची झोड केली आहे.

राखी लॉकडाऊनमध्येही पब्लिसिटीत राहण्यासाठी काही ना काह करताना दिसलीच. कधी कॉफी घेण्यासाठी दिसली आणि जुन्या पुराण्या गोष्टी विसरून मिका सिंगचे कौतुक करताना दिसली. तर कधी रस्त्यात कुण्या अंकलचा क्लास लागवताना दिसली. इतकेच नव्हे तर कधी खूप परकोट करून दमून बघगून जिमच्या बाहेर पडताना दिसली. तर कधी नारळ पाणी पितानासुद्धा दिसली. मात्र या सगळ्यात पीपीई किट घालून भाजीवाल्यासोबत भाज्यांच्या किमतीवर भांडून भांडून कमी दरात भाजी घेण्याचा तिचा व्हिडीओ तुफान वायरल झाला होता. त्यावेळी कोरोनापासून कशा रितीने बचाव करायचा याविषयी देखील ती आपल्या चाहत्यांना तिच्या अंदाजात टीप्स देताना दिसली होती.

You might also like