कोरोनामुळे यंदाचे रक्षाबंधन होणार अनोख्या पद्धतीने साजरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशात श्रावण महिना सुरु झाला कि हिंदू धर्मातील सण उत्सव यांना सुरुवात होते. त्यामध्ये विविध सणाचा समावेश होतो. गणपती, नागपंचमी , रक्षाबंधन असे अनेक सण आहेत. ते मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.रक्षाबंधन म्हंटल कि, इतर वेळी एकमेकांना भेटी गाठी न होणारे भाऊ बहीण त्या दिवशी मात्र आवर्जून एकमेकांच्या घरी जातात. पण यावर्षी मात्र हा सण अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनामुळे कोणाच्या घरी जाण्यास मनाई आहे कि प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेक तरुण भाऊ बहीण मात्र या वर्षी ऑनलाईन पद्धतीने ओवाळणी साजरी करणार आहेत. मात्र इतक्या वर्षाची परंपरा खंडित होऊन अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला जाणार आहे.

या वर्षी बाजरात सुद्धा ऑनलाईन ला महत्व आले आहे. नेहमीसारखी रोषणाई बाजारामध्ये दिसत नाही. अनेक बहिणींनी राखी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या डिझाइन मध्ये खरेदी केल्या आहेत. तसेच अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी केले आहेत. त्यामुळे या वर्षी सणाचा जास्त भार ऑनलाईन इ कॉमर्स कंपन्यांच्या वेब साईट वर आहे. अनेक जण राखी ऑनलाईन माध्यमातून खरेदी करत आहेत. काही जणींनी ऑनलाईन च्या माध्यमातून भावाला राख्या पाठवल्या आहेत. तर अनेक जण बहिणीचे गिफ्ट कुरियर च्या माध्यमातून पाठवले आहेत. यामुळे पारंपरिक बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या ५०% कमी झाली आहे. ऑनलाईन चा ग्राहकांच्या ग्राफ दिवसेंदिवस वाढतच आहे. या वर्षी च्या राख्यांचे आकर्षण प्रत्येक वयानुसार ठरवले आहे. भैया – भाभी राखी, कार्टून राखी, जवानांसाठी वेगळी राखी असे अनेक प्रकार ऑनलाईन मध्ये उपलब्ध आहेत.

ऑनलाईन बाजारामध्ये या वर्षी जास्त कंपो पॅक ला महत्व आले आहे. त्यामध्ये चॉकलेट चे वेगवेगळे पॅक आहेत. तसेच लहान मुलांसाठी पण अनोखे पॅक आहेत. त्याची रेंज साधारण २०० पासून ते ६००० पर्यंत आहे. या वर्षी फ्लिपकार्ट, अमेझॉन , आर्चीज या वेब साईड वापर होताना दिसत आहे. अनेक जण ऑनलाईन व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा देणार आहेत.

Leave a Comment