कोरोनामुळे या वर्षीच्या राख्या पाठवण्याच्या संख्येमध्ये झाली मोठी घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभर कोरोनाने नुसते थैमान घातले दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी आणि सरकार यांचे अनेक प्रयत्न सुरु आहेत पण म्हणावं तास त्यांना यश मिळत नाही. त्याचा असर सर्व गोष्टींवर पडला आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. परंतु कोरोनामुळे हे सण हि साजरे केले जाऊ शकत नाही. दोन दिवसात येणाऱ्या रक्षाबंधन सण दरवर्षी प्रमाणे साजरा होणार नाही. दरवर्षी या काळात राख्या योग्य ठिकाणी पोहचवण्यासाठी पोस्ट ऑफिस कुरियर सेंटर मध्ये हालचाल असतात. पण या वेळी मात्र सर्व शांतता आहे.

रक्षाबंधनच्या काळात अडीच हजार पेक्षा जास्त राख्या बहिणी आपल्या भावांना पाठवत असतात. काही वेळा डाक चा उपयोग करतात तर कधी कुरियर सेन्टर चा उपयोग होतो. पण यावर्षी सर्व वाहने बंद असल्याने यावर्षी फक्त ९० हजार च राख्या पाठवल्या गेल्या आहेत. कोल्हापूर वरून इतर राज्यात जाणाऱ्या राख्यांची संख्या जास्त असते. पण यावर्षी संख्या घटली आहे. कोरोनाच्या काळात ट्रेन आणि बस या धावत नाहीत. त्यामुळे या वर्षी सर्वात जास्त भर हा डाक विभागावर आहे. त्यामुळे डाक विभागातील कर्मचारी राख्या पोहचवण्यासाठी कष्ट घेताना दिसत आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधून साऱ्या राख्या घेऊन डाक विभागाची गाडी रांची कडे निघाली आहे. आणि रांची मधून दुसऱ्या गाडीतून राख्या पुढे पाठवल्या जाणार आहेत. दुसऱ्या राज्यात महाराष्ट्रात येणाऱ्या राख्यांची संख्या जवळपास दीड लाख आहे परंतु पाठीमागच्या वर्षी हीच संख्या जवळपास तीन लाखाच्या घरात होती.

भारतीय डाक क्षेत्रातील विश्वासार्हता दिवसेंदिवस घटत चालली आहे. डाक व्यवस्था हि भारताच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. त्यामुळे खूप सहज वारी आपण इतर कोणाशी संपर्क साधू शकतो. पण आत्ताच्या आधुनिक मार्गाने एकमेकांशी संपर्क साधने खूप सोपं झाले आहे त्यामुळे डाक विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. पण आत्ताच्या कोरोना च्या काळात डाक घर ला महत्व आले आहे. महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक गावात डाक घर आहे. आपण कोरोनाच्या काळात स्पीड पोस्ट आणि सामान्य रजिस्ट्री यांची संख्या कमी झाली आहे.

डाक विभागाच्या माध्यमातून पण कोरोना संक्रमित क्षेत्रात जाण्यापासुन लोकांना रोखलं जात आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होईल म्हणून प्रवेश देण्यास इतर लोकांना मनाई केली आहे. त्यामुळे राख्या पण यावर्षी वेळेवर पोहचल्या जात नाहीत. अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे रक्षाबंधनाचा सण पण काही भावांना अजून राख्या मिळाल्या नाहीत अश्या तक्रारींचे प्रमाण पण वाढले आहे. १३ जून ला पाठ्वलेल्या राख्या अजून मिळाल्या नाहीत असं एका बहिणीचं मत आहे . तिने अनेक वेळा तक्रार करूनही वेळेत राखी अजून पोहचली नाही त्यामुळे ती डाक च्या कामकाजावर नाराज आहे. डाक विभागामध्ये २० ग्राम वजन असलेल्या राखी ची रजिस्ट्री फि २२ रुपये आहे तर ४० ग्राम पर्यंत असणारी राखी २७ रुपये आहेत आणि तीच जर राखी हाय स्पीड ने पाठवायची असेल तर त्याचा दर ४२ रुपये आहे. त्यापेक्षा वजन जास्त असल्यास कमीत कमी ५० रुपयांपर्यंत त्याचा खर्च येऊ शकतो.

Leave a Comment