हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. मात्र, यानंतर आता सर्वांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर दिसून आली.
बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ही मोदींची खिल्ली उडवली. त्यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये यांनी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे एडीट करुन तयार केलेला छोटा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार देणारी महिला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन आहेत. असं म्हणते आणि त्यानंतर मोदींच्या संवादामधील रडण्याची क्लिप व्हिडीओत लावण्यात आली आहे.
THE BEST OSCAR EVER🙏🙏🙏 pic.twitter.com/KRfD0UTlrb
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 22, 2021
नक्की काय आहे प्रकरण –
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीतील मोदींनी डॉक्टरांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.