मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाला सुरवात; पाहा Live दृश्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. यांनतर पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी स्थळावर भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहोचले.

या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच त्या व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत दाखल झाले असून सर्व निमंत्रितही या ठिकाणी पोहोचले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment