राम मंदिराच्या भूखंड खरेदीत घोटाळा?? अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18 कोटींचा करण्याची किमया ट्रस्टने साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली हा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, “संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या जमीन व्यवहाराचे साक्षीदार राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय बनले होते. मात्र त्यानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यापैकी 17 कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले.”दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव प्रतिसेकंद जवळपास साडेपाच लाख रुपयांनी वाढला. भारतच काय जगात कुठेही कोणाच्या जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही.

दरम्यान, ट्रस्टने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टचे महासचिव आणि विहिंपचे नेते चंपत राय आंनी अधिकृत पत्र जारी करून हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही खरेदी केलेला भूखंड बाजार भावानेच खरेदी केला आहे. मात्र राजकीय लोक द्वेषाने प्रेरित होऊन संभ्रम निर्माण करत आहेत, असं चंपत राय यांनी म्हटलं आहे

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like