केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दिल्लीत निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ramvilas Pasvan) यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील रुग्णालयात पासवान यांनी शेवटचा श्वास घेतला. पासवान याचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 

रामविलास पासवान यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्विट चिराग पासवान यांनी केलंय.

दरम्यान, बिहारच्या निवडणुकांच्या आधी पासवान यांचा मृत्यू होणे धक्कादायक असून त्याचा निवडणुकांवर मोठा परिणाम पडेल असे बोलले जात आहे. रामविलास पासवान यांच्या निदानाने देशाने एक मोठा दलित नेता गमावला आहे.

Leave a Comment