पुणे | भोर तालुक्याच्या पूर्व भागातील सारोळा गावच्या – हद्दीत पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ असलेल्या रान झुडपात रानगव्यांच्या दर्शन झाल्याने नागरीकांची पळापळ झाली. महामार्गावर रानगव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तर अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केला. मात्र रानगव्यांच्या महामार्गावरील एंन्ट्रीने प्रवाश्यांसह वनविभागाचीही भांबेरी उडाली होती.
पुणे सातारा महामार्गावर गव्यांचे दर्शन#hellomaharashtra pic.twitter.com/4B5OHu9N73
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2021
सारोळा गावच्या हद्दीत महामार्गावरील हे गवे वनविभागाने भोर रेस्क्यू टीमच्या मदतीने जंगलात सुखरूप सोडण्यात आले. दरम्यान, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने गव्यांना घटनास्थळानरून हलविण्याच्या मोहीमेत अडथळा येत होता. अखेर रेस्क्यू टीमने राजगड पोलिसांना पाचारण करावे लागले. पुणे-सातारा महामार्गाच्या महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्याकडेला असलेल्या मोकळ्या पटांगणात तीन रानगावे असल्याचे नागरिकांना पाहायला मिळाले. यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
किकवी येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रानगवे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती आटोक्यात नसल्याने रानगवे पकडण्यासाठी भोर आणि नसरापूर वनपरिक्षेत्रतील पथकाला पाचारण करण्यात केले होते. यावेळी महामार्गावरून बघ्यांची संख्या वाढल्याने भेदरलेले रानगवे रानाझुडपाच्या आड दबा घेऊन बसले होते. अखेर यशस्वी मोहीम राबवून वनविभागाने तिन्ही रानगव्यांना जंगलात सुखरूप सोडले आहे.