खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर भाजपकडून मोठी जबाबदारी; ‘या’ कमिटीवर केली निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची नुकतीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई मार्गे पाहणी केली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात रस्त्यासह पाणी प्रश्नावर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून काम पाहिले जात आहे. याची दखल घेत भाजपकडून निंबाळकर यांची देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावतीने निबाळकरांची नुकतीच निवड करण्यात आली. देशाच्या शेतीसह पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जल जीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून ते कशा पद्धतीने ते पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे, केंद्र व राज्य याव्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे अशा अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचे काम पाणी वाटप कमिटीद्वारे पाहिले जाते. या कमिटीवर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली.

दरम्यान निवडीबाबतचे शासन स्तरावरचे सर्व आदेश काढण्यात आले आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नवकीच याचा फायदा होईल. माढा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याचे जे उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत, ते सुद्धा या निमिताने निकाले निघतील. या निवडीमुळे माढा लोकसभा मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.