पार्ले रेल्वे पूल प्रश्नी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंकडून अधिकाऱ्यांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पार्ले येथील गेट नंबर 98 च्या भूयारी पुलाचे काम सुरु करण्याच्या मागणीबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. तसेच कराड रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व शेतकरी नेते सचिन नलवडे आणि रामकृष्ण वेताळ यांच्यात पुण्यात एक बैठक पार पडली. यावेळी भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना रेल्वेमंत्री दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले.

पुणे येथे पार पडलेल्या बैठकीवेळी सचिन नलवडे यांनी पार्ले येथील रेल्वे भूयारी मार्गाचे काम त्वरित सुरु करून पावसाळ्यापूर्वी बोगद्यातील पाणी काढून देण्याची मागणी केली तसेच पुणे मिरज रेल्वे दुहेरिकरण मध्ये विविध गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. अद्यापही त्यांची संयुक्त मोजणी करून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. ते प्रस्ताव लवकर तयार करावेत, अशी मागणी केली.

यावेळी मंत्री दानवे यांनी पार्ले भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करुण ग्रामस्थानची ग़ैरसोय दूर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रत्यक्षात रेल्वे बाधित होत आहे. त्यांचे सर्वे नंबर, गट क्रमांक गावनिहाय देण्यात यावेत, अशा असूचना मंत्री दानवे यांनी केल्या. यावेळी पुणे येथील बैठकीस रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी, रेल प्रबंधक रेणु शर्मा, कृष्णत नलवड़े, जालिंदर पवार ग्रामपंचायत सदस्य वड़ोली, सुभाष नलवडे, रोहित डूबल उपस्थित होते.

Leave a Comment