व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

42 वर्षांच्या दाजीचे अल्पवयीन मेव्हणीसोबत घृणास्पद कृत्य, पुण्यातील घटना

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये दाजी आणि मेव्हणीच्या नात्याला काळिमा फासणारी एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बहिणीला नांदविणार नाही, अशी धमकी देत आपल्याच अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केला आहे. यामधून हि पीडित मुलगी 5 महिन्यांची गर्भवती राहिल्याने हि घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गाडीतळ येथे राहणाऱ्या 15 वर्षांच्या पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नराधम दाजीला अटक करण्यात आली आहे.

हा सगळा प्रकार गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला. आरोपी नराधम हा पीडित मुलीच्या बहिणीचा पती आहे. डिसेंबर 2020 मध्ये घरात कोणी नसताना त्याने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या बहिणीला नांदवणार नाही, अशी धमकीसुद्धा पीडित मुलीला दिली.

यानंतर पीडित मुलीने घाबरून हा प्रकार कोणाला सांगितला नाही. यानंतर आरोपी नराधमाने याचा फायदा घेत वेळोवेळी या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर याच लैंगिक अत्याचारातुन पीडित मुलगी 5 महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर या मुलीने हा प्रकार उघडकीस येताच आपल्यावरील अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दाजीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.