Friday, January 27, 2023

धक्कादायक ! परळीत विवाहित महिलेवर बलात्कार

- Advertisement -

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेला धमकावत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी इसमाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळानजीकच्या खामगाव या ठिकाणी घडली आहे.

28 जून रोजी पहाटे 4 वाजता आरोपी लहु लिंबाजी घडवे हा घरी आला आणि त्याने घराची कडी वाजवली. पती घरी आला असावा असे वाटल्याने या महिलेने घराचा दरवाजा उघडला. यानंतर आरोपीने महिलेला धमकी देत घरात प्रवेश केला आणि बलात्कार केला. तसेच आरोपीने पीडितेला ‘गावात राहू देणार नाही’, अशी धमकीदेखील दिली.

- Advertisement -

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी लहू लिंबाची घडवे याच्या विरुद्ध कलम 376, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.