रवा आप्पे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली /  रवा आप्पे हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. रवा आप्पे झटपट तयार करता येतात त्यामुळे सकाळी घाईच्या वेळी हा पदार्थ बनवू शकतो.

साहित्य –
१) ३/४ कप जाड रवा
२) १ कप आंबट ताक
३) चवीपुरते मिठ
४) १/२ टिस्पून जिरे
५) ३ हिरव्या मिरच्या
६) कढीपत्ता
७) १/४ कप कांदा
८) १/२ टिस्पून आलेपेस्ट
९) खायचा सोडा
१०) १/४ कप तेल

कृती –
रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलेपेस्ट, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
मिश्रणात २ चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे.
आप्पे पात्र गॅसवर गरम करत ठेवावे. अप्पेपात्राला तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे.
वरून झाकण ठेवून मिडीयम गॅसवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी.
काट्याने पलटून दुसरी बाजू थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.
नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे.

( टीप- आवडीप्रमाणे यात भाज्या घालू शकता.

इतर पदार्थ –

दहीवडा

कैरीचे पन्हे

मठ्ठा

Leave a Comment