रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात; दोन गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या कारचा अपघात झाला आहे.बुलढाण्याहून मुंबईकडे जात असताना तुपकरांच्या वाहनाला भरधाव वेगातील दुचाकीस्वारांनी धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन्ही तरुण जखमी झाले असून तुपकरांनीच त्यांना औरंगाबादेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या नियोजित बैठकीसाठी रविकांत तुपकर मुंबईकडे निघाले असताना मध्यरात्री 12 वाजता चिखलीजवळच्या बेराळा फाट्यानजीक अपघात झाला.
चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली.  गजानन सोलंकी आणि तुषार परिहार अशी दोन्ही जखमींची नाव आहेत.

दुचाकीचा वेग खूप जास्त असल्याने मोटर सायकल नियंत्रित करण्यात चालकांना अपयश आले. परिणामी दोन्ही वाहनाची जबर धडक झाल्याने दुचाकीवर बसलेल्या दोन्ही युवकांना गंभीर मार लागला. रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा वेगही अधिक होता घटनेनंतर लगेच जखमी युवकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दोन्ही युवकांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.