Wednesday, February 8, 2023

साताऱ्यात दराची कोंडी फुटली : रयत- अथणीकडून एकरकमी 2925 रुपये ऊस दराची घोषणा

- Advertisement -

कराड | शेवाळेवाडी-म्हासोली, (ता. कराड) येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन 2,925 रुपयांप्रमाणे एफआरपी एक रक्कमी ऊस
बिलाची रक्कम देणार असल्याची घोषणा अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

शेवाळेवाडी ता. कराड येथील अथणी रयत शुगर्स चा गळीत हंगाम शुभारंभ रयत कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी घोषणा केली. या घोषणे मुळे सातारा जिल्ह्यतील ऊस दराची कोंडी फुटली आहे. यावेळी रयत चे व्हा चेअरमन आपासाहेब गरुड, अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील,युनिट हेड रवींद्र देशमुख शेती अधिकारी विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisement -

उदयसिंह पाटील उंडाळकर बोलताना म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उसाला योग्य व स्पर्धात्मक ऊस भाव मिळत आहे याचे सर्वांबरोबर मला ही तितकेच समाधान वाटत आहे. आज रयत सहकारी साखर कारखाना अथणी शुगर्स च्या माध्यमातून कर्जमुक्ती कडे वाटचाल करत असून संस्थापक स्वर्गीय विलासराव काकांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. एक रकमी एफआरपी देण्याच्या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.