हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rayat Shikshan Sanstha Bharti 2025। रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रयत शिक्षण संस्था, मध्य विभाग, कार्यक्षेत्रातील सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये शिक्षक पदे भरवायची आहेत. याअंतर्गत तब्बल १४० पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी एम. ए., एम. कॉम. ॥ एम.एस्सी. ॥ एम. एस्सी अॅग्री. बी.एड. शैक्षणिक अहर्तेच्या खालील विषयांच्या संभाव्य जागा जाणार आहेत. या सर्व जागा हंगामी / तात्पुरत्या स्वरुपात पूर्णवेळ, अर्धवेळ अथवा तासिका तत्वावर भरावयाच्या आहेत. या शिक्षक भरतीसाठी गुरुवार, दिनांक ०५/०६/२०२५ रोजी सातारा येथे वॉक इन इंटरव्यू आयोजित केला असून इच्छुकांनी भेट देणं आवश्यक आहे.
कोणत्या विषयासाठी किती शिक्षकांची भरती?
मराठी १६, इंग्रजी १७, हिंदी ४, इतिहास ४, भूगोल – ७,अर्थशास्त्र -५, मानसशास्त्र १, जीवशास्त्र – १६, भौतिकशास्त्र १७, रसायनशास्त्र १७, गणित १३, कृषी विज्ञान १ पुस्तकपालन व लेखाकर्म- २, व्यापार संघटन आणि व्यवस्थापन -३, चिटणीस कार्यपद्धती ३, शा. शिक्षण ०७, पर्यावरण ०६, माहिती तंत्रज्ञान (विज्ञान) – १ पदासाठी भरती होणार आहे. या पदांची संख्या हि संभाव्य असल्याने त्यात काही बदल सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुठे आहे मुलाखत? Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
या भरतीकरिता (Rayat Shikshan Sanstha Bharti 2025) निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी Walk-in-Interview साठी गुरुवार, दिनांक ०५/०६/२०२५ रोजी अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सातारा या ठिकाणी सकाळी ०९.३० वाजता उपस्थित रहावे. विहित नमुन्यातील नोकरी अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी रक्कम रु.१००/- रोख भरून दिला जाईल तो भरून देणे आवश्यक आहे. अर्जासोबत पदवी व पदव्युत्तर पदवीची गुणपत्रके व प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ. च्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी साक्षांकित प्रती मूळ कागदपत्रांवरून तपासल्या जातील.