रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन; विद्यार्थी, पालक भयभीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आता सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्पन्न झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शालेत विद्यर्थी कोरोना पोझिटीव्ह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थांना कोरोनाची लागन झाल्याचे समजत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सेवागिरी शाळा बंद ठेवण्यात आली आहे. आता शाळेतील सर्व विद्यार्थांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. एका विद्यार्थामुळे या सहा विद्यर्थ्यांना लागन झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेने सर्व विद्यार्थांचे पालक भयभीत झाले आहेत.

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद शहर आणि परभणी येथे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

You might also like