RBI ने हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी जारी केले नवीन नियम, याचा तुमच्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of india) ने हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. या सूचना लिक्विडिटी कव्हरेज रेश्यो, रिस्क मॅनेजमेंट आणि लोन टू व्हॅल्यू रेश्यो यांच्याशी संबंधित आहेत. केंद्रीय बँकेने सांगितले की, या सर्व सूचना तत्काळ प्रभावाने जारी करण्यात आल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, या नवीन सूचना जारी करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी (HFCs) असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे नुकसान होईल.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी याबाबतची माहिती दिली आहे. त्याशिवाय आरबीआयने या संदर्भात मास्टर डायरेक्शन-नॉन-बँकिंग फायनान्सिअल कंपनी-हाउसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) डायरेक्शन्स, 2021 जारी केले आहेत.

नवीन नियम म्हणजे काय?
जारी केलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, HFCs नी लिस्टेड शेअर्सची हमी देऊन कर्ज दिल्यास त्यांना 50% लोन टू व्हॅल्यू रेश्यो मेंटेन करावा लागेल. त्याचवेळी HFCs ला सोन्याच्या दागिन्यांच्या हमीच्या कर्जावर 75% एलटीव्ही रेश्यो मेंटेन करावा लागेल.

HFC म्हणजे काय?
कोणत्याही नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीच्या एकूण मालमत्तेपैकी 60% हाउसिंग सेक्टरला कर्जासाठी दिली गेली तर त्याला HFC म्हणतात. आरबीआयने म्हटले आहे की, HFCs लिक्विडिटी कव्हरेज रेश्योच्या दृष्टीने लिक्विडिटी बफर मेंटेन ठेवावा लागेल. भविष्यात रोख रकमेशी संबंधित कोणत्याही अडचणी असल्यास त्यांना या निधीमध्ये मदत होईल.

रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग आणि फायनान्स सेक्टरचे कामकाज सुरळीतपणे सुरू करण्यासाठी नवीन प्रयत्न करत आहे. कोविड -१९ नंतर पुरेशी लिक्विडिटी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी अशी अनेक पावले उचलली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment