RBI ने आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँकेला ठोठावला 1.12 कोटी रुपयांचा दंड, त्यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने हैदराबाद येथील आंध्र प्रदेश महेश सहकारी सहकारी अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सिस्टम मधील त्रुटी आणि FD च्या व्याजदरावरील फसवणूकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने RBI ने देशातील 3 बँकांवर कारवाई केली आहे.

या बँकांमध्ये महाराष्ट्र राज्याची आघाडीची सहकारी बँक असलेली सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक आणि अहमदाबाद मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे.

RBI ने अहमदाबाद मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला 62 लाख 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय मुंबईच्या सारस्वत सहकारी बँकेला 25 लाख आणि एसव्हीसी सहकारी बँकेला 37 लाख 50 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महेश सहकारी अर्बन बँकेने FD आणि KYC च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे RBI च्या निदर्शनास आले होते. FD वरील व्याज दरामध्ये फेरफार केल्याबद्दल अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय FD वरील व्याजदराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या सूचना आणि अहवाल देण्यात आल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment