1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे होणार टोकनाइजेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी 1 ऑक्टोबरपासून काही नियमांत बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या लोकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (tokenisation) हा नियम लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार, टोकनायझेशन (tokenisation) प्रणाली लागू केल्यानंतर, कार्डधारकांचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. या लोकांना बँकांकडून कार्डच्या टोकनीकरणाचे (tokenisation) मेसेजही मिळू लागले आहेत. यामुळे आता लोकांना कार्ड टोकनायझेशन (tokenisation) म्हणजे काय, कार्ड टोकनायझेशनची प्रक्रिया काय आणि त्याचे फायदे-तोटे काय असे प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊया कार्ड टोकनायझेशनची संपूर्ण प्रक्रिया…

टोकनाइजेशन न केल्याने होणार तोटा
हा नवीन नियम लागू झाल्यानंतर, जेव्हा जेव्हा ग्राहक पॉइंट ऑफ सेल मशीन्सवर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे, ऑनलाइन किंवा कोणत्याही अ‍ॅपमध्ये पेमेंट करतील तेव्हा त्यांचे कार्ड तपशील एनक्रिप्टेड टोकनच्या (tokenisation) स्वरूपात संग्रहित करण्यात येईल. यापूर्वी हा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार होता. मात्र काही कारणास्तव 30 जून 2022 पर्यंत वाढवली होती. यानंतर ती पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता पेमेंट कंपन्यांना 30 सप्टेंबर 2022 नंतर लोकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा जुना डेटा मिटवावा लागणार आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जर तुम्ही कार्ड टोकनायझेशन केले नाही, तर तुम्ही याआधी विविध प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर सेव्ह केलेल्या कार्डद्वारे व्यवहार करता येणार नाही.

नवीन नियमांमुळे तुम्हाला होईल हा फायदा
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या बदल्यात आतापर्यंत 195 कोटी टोकन ग्राहकांना देण्यात आले आहेत. मात्र, अशा ग्राहकांची संख्या अजूनही करोडोंच्या घरात आहे, ज्यांनी अद्याप आपले कार्ड टोकन घेतलेले नाही. नवीन नियमांनुसार रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन (tokenisation) आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करणार आहे. त्यामुळे आता हा नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंटसाठी थेट कार्ड वापरण्याऐवजी युनिक टोकन वापरावे लागणार आहे.

टोकनीकरणामुळे फसवणूक कमी होणार
कार्डच्या बदल्यात टोकन (tokenisation) देऊन पैसे देण्याची प्रणाली लागू केल्याने फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे असा रिझर्व्ह बँकेकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती लीक झाल्यामुळे ग्राहकांशी फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता नवीन प्रणालीमुळे अशा फसवणुकीच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे.

तुमचे क्रेडिट/डेबिट कार्ड टोकन कसे करायचे?
कार्ड टोकन (tokenisation) करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती नुकतीच रिझर्व्ह बँकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तुम्ही घरबसल्या फक्त सोप्या 06 स्टेप्सद्वारे हि प्रक्रिया करू शकता.

1) सर्व प्रथम कोणतीही ई-कॉमर्स वेबसाइट उघडा. त्यानंतर खरेदी करण्यासाठी कोणतीही वस्तू निवडा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
2) यानंतर चेक आऊटच्या वेळी आधीच सेव्ह केलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरा.
3) त्यानंतर तुम्हाला ‘RBI Guidelines on Secure Your Card Age’ किंवा ‘RBI Guidelines on Tokenize Your Card Age’ असा पर्याय दिसेल. त्यानंतर यावर क्लिक करून हा पर्याय निवडा.
4) यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेलवर एक OTP येईल. त्यानंतर हा OTP सबमिट करा आणि आपला व्यवहार पूर्ण करा.
5) यानंतर तुम्हाला Generate Token चा पर्याय मिळेल. ते निवडा. असे केल्याने टोकन जनरेट होईल आणि तुमच्या कार्डच्या माहितीऐवजी, टोकन दिलेल्या वेबसाइट/अ‍ॅपवर सेव्ह केले जाईल.
6) आता तुम्ही पुन्हा त्याच वेबसाइट किंवा अ‍ॅपवर गेल्यावर तुम्हाला सेव्ह केलेल्या टोकनसह कार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. हे चार-अंक तुम्हाला पेमेंट करताना तुमचे पसंतीचे कार्ड निवडण्यात मदत करेल.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!