बंडखोर आमदार संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले संजय राठोड (Sanjay Rathore) यांना क्लिन चिट मिळाल्याचे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की, संजय राठोड (Sanjay Rathore) यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड (Sanjay Rathore) यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लिन चिट दिले असल्याचे सांगितले. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की, नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीच सांगितले नाही.

आज दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे. तसेच अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी माजी वन मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Leave a Comment