व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! बंडखोर आमदार योगेश कदम यांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाला आमदारकी वाचवण्यासाठी भाजप किंवा प्रहार मध्ये विलीनीकरण करावं लागेल असेही म्हंटल जातंय. याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार योगेश कदम यांनी आपण शिवसेनेतच राहणार आहोत अस ट्विट केलं आहे.

सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. अस योगेश कदम म्हणाले.

तसेच ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका..मी शिवसैनिक!, असे ट्विट कदम यांनी केले आहे.

दरम्यान, आमदारांच्या बंडखोरी नंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेक आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे येत्या 3-4 दिवसात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळू शकतात.