व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये 1041 जागांसाठी बंपर भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1041 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई

भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे

पद संख्या – 1041 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

नॉन-एक्झिक्युटिव्ह –

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अर्ज करणार्‍या 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI/ Aprentice डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs.13,200/- ते Rs.83,180/- दरमहा

असा करा अर्ज –

उमेदवार एमडीएलची अधिकृत वेबसाइट, mazagondock.in करियर सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जाऊ शकतात.

तसेच ऑनलाईन APPLY करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी एक नवे अकाउंट तयार करायचे आहे.

आपले यूजर नेम आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in