भारतीय रेल्वेत 32 हजार रिक्त पदांसाठी भरती; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची अंतिम तारीख पहा

0
4
Indian Railways
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती मंडळाने (RRB) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या ग्रुप डी लेव्हल-1 भरती अंतर्गत 32,000 हून अधिक रिक्त पदांसाठी (Job Requirement) अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे वेळ न दवडता उमेदवारांनी अर्ज करावा.

कोण अर्ज करू शकतो?

या भरतीसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 36 वर्षे असावे. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 जानेवारी 2025 हा आधार घेतला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी आणि उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तसेच, ओबीसी-एनसीएल प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, जम्मू-काश्मीर अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास), आणि अन्य आवश्यक कागदपत्रे भरतीच्या अटींनुसार मागवली जातील.

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित चाचणी (CBT) घेतली जाईल. त्यानंतर, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार पडल्यावरच अंतिम निवड होईल.

अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करा

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.rrbapply.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. त्यानंतरच संपूर्ण अर्ज भरावा, अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्या जवळ देखील ठेवावी.