पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे पाच वर्षांसाठी उघडले जाते. आरडी देखील एफडी प्रमाणेच आर्थिक गुंतवणूकीसाठीचा एक पर्याय आहे, मात्र येथे गुंतवणूकीत अधिक सुलभता आहे. एफडीमध्ये तुम्हाला कुठल्याही योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. आरडीमध्ये आपण एसआयपीसारख्या वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये मंथली बेसिसवर गुंतवणूक करू शकता. यामध्ये, तिमाही आधारावर आपल्या खात्यात व्याज वाढविले जाते.

आरडी वर व्याज कंपाऊंडिंगनुसार जोडले जाते. याचा अर्थ असा की याचा कालावधी जितका जास्त असेल त्यानुसार तितका नफा वाढेल. म्हणून आरडी ठेवताना दीर्घ मुदतीसाठीचे लक्ष्य ठेवले पाहिजे. पोस्ट ऑफिस आरडीवरील व्याज 8.8 टक्के आहे. तर अनेक बँकांमध्ये यापेक्षा कमी व्याज मिळत आहे. या आरडी योजनेत तुम्ही दर महिन्याला किमान १०० रुपये गुंतवू शकता. या व्यतिरिक्त आपण १० च्या मल्टीपल मध्ये कोणतीही रक्कम जमा करू शकता. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही आहे. १० च्या मल्टीपल मध्ये आपण कोणतीही रक्कम या आरडी खात्यात जमा केली जाऊ शकते.

पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवरील व्याज दर वर्षी 5.8 टक्के तिमाही कंपाउंडिंग आहे. पोस्ट ऑफिसमध्ये, आरडीमध्ये जमा केलेल्या पैशांची व्याज दर तिमाहीत (वार्षिक दराने) केली जाते आणि ती प्रत्येक तिमाहीच्या शेवटी आपल्या खात्यात जोडली जाते. या संदर्भात 5 लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला 10 वर्षांसाठी दरमहा 3000 रुपये गुंतवावे लागतील. व्याज दर अजूनही 5.8 टक्केच राहील तेव्हा हे आहे. येथे तुम्हाला एकूण 3.60 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 1.40 लाख रुपयांचे अतिरिक्त व्याज मिळेल.

कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर हवी तितकी आरडी खाती उघडू शकते. या खात्यांसाठीच्या जास्तीत जास्त संख्येवर कोणतेही बंधन नाही. होय, फक्त हे लक्षात असू द्या की खाते केवळ वैयक्तिकरित्या उघडले जाऊ शकते, कुटूंबाच्या (एचयूएफ) किंवा संस्थेच्या नावाने नाही. दोन प्रौढ व्यक्ती एकत्र जॉईंट आरडी खाते देखील उघडू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment