चिथावणीखोर दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी लावले पिटाळून; शेतकऱ्यांच्या रोषाचा करावा लागला सामना; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले. दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. यावेळी शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर मुसंडी मारली. दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu ) याचं नाव पुढे येत आहे. दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत. दरम्यान, आता दीप सिद्धूचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

हा व्हिडीओ आज सकाळचा असल्याचे सांगितले जात आहे. लाल किल्ल्यावरून गायब झालेला दीप सिद्धू आज सकाळी पुन्हा आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेला होता. यावेळी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. तसेच आंदोलकांना हिंसेकरीता चिथावणी दिल्याचा त्याच्यावर आरोप केला. शेतकऱ्यांचा रोष पाहता अखेर दीप सिद्धू आणि त्याच्यासोबत आलेल्या काही जणांनी तेथून धूम ठोकत पळ काढला. दीप सिद्धूच्या मागून काही शेतकरीही धावले. अखेर दीप सिद्धू एका बाईकवरून पसार झाल्याचे या व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

दरम्यान, दीप सिद्धू याचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अभिनेता सनी देओलसोबत व्हायरल झाल्याने त्याला शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळविण्यासाठी पाठविल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. यामुळे दीप सिद्धू कालपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू यांच्यावर आरोप केले आहेत. “दीपू सिद्धू आणि गँगस्टर ते नेता असा प्रवास केलेल्या लखा सिधाना यांनी काल रात्री सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भडकावण्याचं काम केलं”, असा थेट आरोप यादव यांनी केला आहे. यासोबतच एक मायक्रोफोन घेऊन दीप सिद्धू लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी व्हायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. योगेंद्र यादव यांच्यासोबच भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment