क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना दिलासा, सरकारने सांगितले,”आम्ही क्रिप्टोच्या विरोधात नाही, लवकरच रेग्युलेशन तयार होईल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की,” लवकरच क्रिप्टोकरन्सीच्या नियमनचे काम लवकरच पूर्ण होईल, सरकारची भूमिका क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात नाही.” अर्थमंत्री म्हणाल्या की,” क्रिप्टोकरन्सी हे प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र आहे, ज्यामुळे जगभरात बरेच बदल होत आहेत.”

‘क्रिप्टोकरन्सीला नाही म्हणालो नाही’
ET ला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण म्हणाल्या, “आम्ही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही क्रिप्टोकरन्सीला नाही म्हणालो नाही. फिनटेक क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान कसे मदत करू शकते हे आम्हाला पाहावे लागेल.” त्या पुढे म्हणाल्या की,”क्रिप्टोकरन्सीसंदर्भात नियमन करण्यासाठी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सोबत काम करेल. सीतारमण म्हणाल्या की,”क्रिप्टोकरन्सीशी संबंधित नियमन अंतिम केले जात आहे आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यावर निर्णय घ्यावा.”

Air India आणि BPCL चे खाजगीकरण या वर्षाच्या अखेरीस पूर्ण केले जाईल
Air India आणि BPCL च्या खाजगीकरणाबाबत त्या म्हणाल्या की,” ही प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.” सीतारामण पुढे म्हणाल्या की,” जेव्हा सरकार एखाद्या कंपनीची मालकी सोडून देते, तेव्हा त्यासाठी अधिक योग्य ती काळजी आवश्यक असते. LIC च्या पब्लिक ऑफरबाबत त्यांनी सांगितले की,” यात कोणतीही अडचण नाही आणि त्यात विकल्या जाणाऱ्या भागभांडवलाची माहिती नंतर दिली जाईल. चीनमधून बाहेर पडण्याऱ्या कंपन्यांसाठी भारतात चांगली क्षमता आहे.”

Leave a Comment