अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन झाले दुप्पट

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात टॅक्स कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आतापर्यंत नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन दुप्पटीहून अधिक 1.85 लाख कोटींवर गेला आहे. नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये समाविष्ट कॉर्पोरेट इनकम टॅक्स (Corporate Income Tax) कलेक्शन 74,356 कोटी रुपये आहे तर सिक्योरिटी ट्रांझॅक्शन टॅक्स (Security Transaction Tax) पर्सनल इनकम टॅक्स 1.11 लाख कोटी रुपये आहे.

सीबीडीटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान रीफन्ड केलेल्या टॅक्सची रक्कम वगळता नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 1,85,871 कोटी रुपये होते, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते 92,762 कोटी रुपये होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 100.4 टक्के वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 30,731 कोटी रुपयांचा टॅक्स परत झाला आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ग्रॉस डायरेक्ट टैक्स कलेक्शन 2.16 लाख कोटी रुपये होते, तर मागील वर्षी याच काळात 1.37 लाख कोटी रुपये होते.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रॉस कॉर्पोरेट इनकम टॅक्स 96,923 कोटी रुपये आहे तर पर्सनल इनकम टॅक्स 1.19 लाख कोटी रुपये आहे. अ‍ॅडव्हान्स टॅक्स कलेक्शन 28,780 कोटी तर TDS 1,56,824 कोटी रुपये होते. सेल्फ असेसमेंट टॅक्स 15,343 कोटी आणि रेग्युलर असेसमेंट टॅक्स 14,079 कोटी रुपये आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like