चांगली बातमी! रेमडिसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनावरील उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे औषध रेमडिसिवीर याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या सतत कानावर येत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत रेमडिसिवीरचा तुटवडा आधीक असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने रेमडिसिवीर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिमाडिसिवीर वरील आयात कर हटवण्यात आला आहे. ही बाब आता दिलासादायक ठरत आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरानं या संदर्भातील एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार रेमडिसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटविण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत लागू राहील. या निर्णयानंतर देशात रेमडिसिवीरचा तुटवडा जाणवणार नसून त्याचा योग्य साठा रुग्णांसाठी उपलब्ध होईल अशी आशाही केंद्रांना व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व जवळपास अनेक राज्यांमध्ये रेमडिसिवीरचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रा बरोबरच इतर काही भागांमध्ये या औषधाचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याच धर्तीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात रेमडिसिवीरचे उत्पादनही वाढवण्यात आले आहे.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना राज्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला. राज्य सरकार सर्व स्तरावर इंजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. आता वर्ध्यातील ‘जेनिटेक लाइफ सायन्स’ ला 30 हजार वायल म्हणजेच कुपी प्रत्येक दिवसाला रेमडिसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच रेमडिसिवीर हे औषध गरजू पर्यंत पोहोचेल अशी आशा आहे.

Leave a Comment