संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सुधीर तुपे मित्र परिवार तर्फे आयोजीत रक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टीव्ही सेंटर चौकात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिबिरास सुरुवात झाली.

या रक्तदान शिबिरात एकूण ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना महामारीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. प्रशासनातर्फे युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी अश्याप्रकारच्या रक्तदान शिबिरामधून बऱ्याच प्रमाणात रक्त संकलनासाठी मदत होते.

सुधीर तुपे मित्रपरिवारतर्फे आयोजीत या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या युवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल. या कार्यक्रमात खासदार भागवत कराड, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केनेकर, भाजपा युवा मोर्चाचे राज वानखेडे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment