भीषण अपघातात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । औरंगाबाद – पुणे महामार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यास जोरदार धडक दिल्याने त्या व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला आहे. भीमराज गोपाळ भरपुरे (वय -60 वर्ष, राहणार- अमळनेर, ता.गंगापूर) असेसेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. गांधी पेट्रोल पंपासमोर रविवारी (ता .28) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर येथील एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराज भरपुरे हे आपल्या लुना गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. रविवारी ( ता.28) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान औरंगाबाद -पुणे महामार्ग वरील गांधी पेट्रोल पंप येथे लुना गाडीत क्रमांक (एम.एच .20 एफ.एस 9885) पेट्रोल भरण्यासाठी जात असताना चारचाकीने धडक दिली. पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी फोर्ड कंपनीची चारचाकी कारने (एम. एच. 19 सी. एफ. 5999) जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भीमराज भरपुरे यांचा गांधी पेट्रोल पंपासमोर अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच लोकांनी हळहळ व्यक्त केली. सदरील घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment