वाळुज MIDC मध्ये पुन्हा गँगवाॅर; जामिनावर सुटताच दगडाने ठेचून खून करुन घेतला बदला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वर्चस्वाच्या लढाईत वर्षभरापूर्वी विरोधी गॅंगच्या सदस्यांची हत्या करून 15 दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची हॉटेलमधून ओढत रस्त्यावर आणून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूज औधोगिक नगरीत पुन्हा टोळी युद्ध उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. विशाल उर्फ मद्या किशोर फसाटे या सराईत गुन्हेगाराला हॉटेल मधून बाहेर ओढत दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री त्याची हत्या करण्यात आली.

याबद्दल सविस्तर अशी, वाळूज परिसरात असलेल्या हॉटेल मृगणायणीमध्ये मयत विशाल उर्फ मद्या किशोर फासाटे बसला होता. त्याला दोन आरोपींनी ओढत बाहेर आणले व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. गेल्यावर्षी वडगावा येथील योगेश प्रधान खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. वर्षभर कारागृहात राहिल्या नंतर 15 दिवसांपूर्वीच तो घरी आला होता.

मयत हा सराईत गुन्हेगार असून त्यावर 7 ते 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. योगेश प्रधान यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या विशाल फसाटे याचा मयत योगेश प्रधानच्या साथीदारांनी दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment