Sunday, February 5, 2023

क्रांती चौक पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगार रईस बोक्याच्या साथीदाराडून सात मोटरसायकली जप्त

- Advertisement -

औरंगाबाद : कुख्यात गुन्हेगार मो. रईस बोक्या याच्या साथीदाराला पोलिसांनी बुधवारी अटक केली असून त्यांच्याकडून 7 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई क्रांती चौक पोलिसांनी केली. शेख आतिफ शेख लतीफ, वय 20 वर्ष (रा. आलमगीर कॉलनी, लाईटच्या टावर जवळ, साजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि. 18) सकाळी 9 वाजता पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत व अन्य पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, एसटी वर्कशॉप समोर रोडवर जाताना एक दुचाकीस्वार दिसला. पोलिसांना संशय निर्माण झाल्याने त्याला थांबून गाडीच्या कागदपत्राविषयी विचारपूस केली असता त्याने कागदपत्रे उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने आपला साथीदार कुख्यात गुन्हेगार रईस बोक्यासोबत मिळून 7 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. शहरातील बेगमरपुरा-1, छावणी-2, क्रांती चौक-4 या भागातून गाड्या चोरल्याची माहिती आरोपीने दिली.

- Advertisement -

कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या हा जेल मध्ये असल्यामुळे त्याच्याकडून कुठलीही माहिती अजून प्राप्त झाली नाही. मात्र, चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जाईल आणि आणखी काही त्याचे साथीदार असतील तर त्यांच्यामार्फत गाड्या मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. सदरील कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त निकेश खाटमोडे पाटिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग विवेक सराफ साहेब व पोलीस निरीक्षक गणपत दराडे, पो.नि. अमोल देवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. संतोष राऊत, मनोज चव्हाण, अजिज खान, पोअं. सुर्यवंशी, अमोल मनोरे, देविदास खेडकर यांनी पार पाडली.