रियाचे वकील म्हणाले, ड्रग्जचं व्यसन, मानसिक आजार असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली हिच तिची चूक होती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केल्यानंतर तिचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील तीन केंद्रीय तपास यंत्रणांकडून रियाला त्रास दिला जातोय, असं सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. ड्रग्जचं व्यसन असलेल्या , मानसिक आजार असलेल्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली हिच तिची चूक होती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

रियाला अटक झाल्यानंतर तिचे वकिल सतीश मानेशिंदे म्हणाले, “न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली,” अशी खंत रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली.

अटकेसाठी रियानं आधीच दर्शवली होती तयारी
प्रेम करणे गुन्हा असेल, तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती स्वतः अटक करून घेण्यासही तयार आहे, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.

अखेर रियाला अटक
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करी व सेवन प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागानं तपास सुरू केली होता. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. मागील तीन दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी रियाची चौकशी सुरू होती. आज (८ सप्टेंबर) तिला अटक करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment