विचित्र अपघात : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात रिक्षाचालक फेकला गेला रस्त्यावर, ड्राईव्हरविना रिक्षा सुसाट (Video)

पुणे | पिंपरी चिंचवड येथील कराची चौकात कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षाचा अपघात झाला आहे. यावेळी रिक्षा चालक पडल्याने ड्राइव्हरविना रिक्षा सुसाट पळाली. रविवारी दुपारी 12.22 वाजता हा अपघात झाला असून सदरचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात झाला आहे.

कराची चौकात आयसीआयसीआय या बँकेच्या एटीएमच्या समोर अपघात झाला. संचारबंदी असल्यामुळे सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही.यावेळी तेथे असणाऱ्या युवकांनी रिक्षा चालकांला मदत केली.

रिक्षा भरधाव येत असताना कुत्रे रस्त्यांच्या मधोमध आडवे आले होते. कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा चालकांचा ताबा सुटल्याने चालक रस्त्यावर पडला. तर रिक्षा विनाचालक सुसाट पळाली, रिक्षा डिव्हाइडरवरून दुसऱ्या रस्त्यावर गेली. तेव्हा समोरून येणाऱ्या युवकांनी धाडसाने रिक्षावर ताबा मिळवला.

You might also like