व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मालवाहतूक गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत माहिती अधिकार कार्यकर्ता अन् नगरपालिकेचा कर्मचारी ठार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव-पलूस मार्गावर तासगाव नजीक एस मालवाहतूक या गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत तासगाव येथील दोन जण ठार व दोन जण जखमी झाले ही घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे राहुलकुमार शिंदे व तासगाव नगरपरिषदेतील कर्मचारी दीपक स्वामी हे दोघे ठार झाले आहेत तर सचिन बाबर व छोटा हत्ती चालक देशमाने हे दोघे जखमी झाले आहेत.

राहुल, दीपक व सचिन हे तिघेजण तासगाव नजीक असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवण करून ते बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत बोलत उभे होते. याच दरम्यान निमणीकडून तासगाव कडे येत असलेल्या मालवाहतूक छोटा हत्ती गाडीने रस्त्याचे विरूध्द बाजूस येऊन या तिघांना जोराची धडक दिली. यामध्ये दीपक स्वामी जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले राहुल शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच ते मयत झाले. तर सचिन बाबर व छोटा हत्ती चालक हे जखमी झाले.

सदर अपघाताचे वृत्त समजताच मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, अभियंता ए.सी.औताडे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, संदीप गुरव, तसेच राष्ट्रवादी चे कार्यकर्ते, नगरपरिषदेतील कर्मचारी, नागरिक यांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.