सैराट मधील आर्ची पुन्हा येतीय, चित्रपटाचा पोस्टर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा आगामी ‘कागर ‘ या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे . हा चित्रपट पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागर चं दिग्दर्शन केलं आहे. तर उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कागर सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे ज्यामध्ये रिंकू एका हटके लुकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असणार? ती साकारत असलेल्या पात्राचे नाव काय हे अजून समजलेले नाही.

इतर महत्वाचे –

नॅशनल क्रश चा वाढदिवस | Priya Prakash Worrier

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती . सुधीर कोलते आणि विकास हांडे हे दोघे या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमातील गाण्यावर डान्स करतानाचा रिंकू राजगुरुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रिंकूच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाला घेऊन बरीच उत्सुकता होती.

‘सैराट’ चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूने रातोरात अनेकांच्या मनात घर केले होते . तिची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की रिंकूला महाराष्ट्र आर्ची म्हणूनच ओळखू लागला. आता याच आर्चीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असल्याचे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment