इरफान-ऋषी कपूर यांचा ‘हा’ फोटो होत आहे प्रचंड व्हायराल, जाणून घ्या फोटो मागची गोष्ट

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा एक फोटोही सध्या चर्चेत आहे.

२०१३ मध्ये दोघांनी डी- डे या सिनेमात एकत्र काम केलं होतं. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या सिनेमातील त्यांच्या एकत्रित सीनपैकी एका सीनचा फोटो त्या दोघांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरने ट्विटरवर दोघांचा या सिनेमातील एक सीनचा फोटो शेअर करून लिहिले की, ‘फार मोठं नुकसान.. फार लवकर गेलात.’

‘डी- डे’ आणि ऋषी-इरफान 
२०१३ मध्ये ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासून प्रेरित भूमिका निभावली होती. तर इरफान खान चित्रपटात रॉ एजंट होते. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील ऋषी कपूर यांचा ‘ट्रिगर खिंच मामला मत खिंच’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. शेजारी शत्रू देश भारतातातील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉनला आपल्या देशात आश्रय देतो. तेव्हा त्याला भारतात परत आणण्यासाठी रॉ आपल्या शत्रू देशात असणाऱ्या गुप्तहेरांना एक जोखमीची मोहीम सोपविते. या मोहिमेत ते कसे यशस्वी होतात आणि या मोहिमेत कुठल्या संकटातून त्यांना जावं लागत असा प्रवास ‘डी-डे’ चित्रपटात दाखवला आहे. दरम्यान, या चित्रपट ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका फार उत्तमरित्या साकारली होती. तर इरफानच्या अदाकारीने हा चित्रपट कायम लक्षात राहणार ठरला होता. या चित्रपटातील इरफान आणि ऋषी कपूर यांच्यातील सीनपैकी एका सीनचा फोटो या दोघांच्या आठवणीत नेटकरी सध्या प्रचंड शेअर करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like