विलासकाकांच्या अतिंम दर्शनासाठी रितेश देशमुखची उपस्थिती; विलासराव देशमुख अन् काकांचे होते जिव्हाळ्याचे संबंध

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. काकांच्या जाण्याने कराड दक्षिण मतदारसंघाने एक हक्काचा माणूस गमावला. विलासराव उंडाळकरांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख हे सुद्धा आले होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासरावजी देशमुख व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे राजकारणा व्यतिरिक्त घनिष्ठ संबंध होते आणि अनेक वेळा विलास काका विलासराव देशमुख यांच्या घरी उपस्थित असत याच ठिकाणी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांची व विलास काका यांची ओळख घट्ट होत गेली.

दोन दिवसापासून कराडमधील भोसले कुटुंबीयांकडे पाहुणे म्हणून आलेल्या रितेश देशमुख यांना विलास काका यांच्या निधनाची बातमी समजताच ते विलास काकांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबा भोसले हे उपस्थित होते अंतिम दर्शनानंतर अभिनेते रितेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला मात्र विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचं सांत्वन करून काकांचे अंतिम दर्शन घेऊन निघून गेले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like