रितेश-जेनेलियाला धक्का; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मराठी – हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांना एका प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील भुखंड प्रकरणी मे. देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चौकशीचे आदेश राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे. रितेश देशमुख यांना लातूरमधील भुखंड प्रकरण भोवणार कि नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपच्यावतीने लातूरमधील भुखंड प्रकरणी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आला आहे, असा आरोप भाजपने केला होता. लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेने त्यांना 116 कोटींचा पुरवठा काही दिवसातच केला होता. तसेच संबंधित कंपनीला लातूर एमआयडीसीत नियमांचं उल्लंघन करून भूखंड दिला होता, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

कमी कालावधीत अवघ्या महिन्याच्या आत रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना बॅँकेकडून कर्ज मिळाले. ज्या बँकेने आतापर्यत किती जणांना कर्ज दिले? त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन व्हावेत, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार आता दोघांच्या कंपनीची चौकशी करण्याचे आदेश भाजपचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत.