रस्ता बंद : चाफळ- पाटण मार्गावरील दाढोली घाटातील रस्ता खचला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चाफळ- दाढोली मार्गे सडावाघापूर, पाटणला जाणारा रस्ता दाढोली घाटात मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहीती उंब्रज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे.

प्रभूरामांचे मंदिर असलेले चाफळ या गावातून पुढे पाटण व पर्यटन क्षेत्र असलेल्या सडावाघापूर याठिकाणी रस्ता जात आहे. परंतु दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने दाढोली या घाटातील रस्ता खचलेला आहे. त्याचबरोबर याठिकाणी रस्त्यांवर चिखल आणि खडी पसरलेली असल्याने वाहतुकीस धोका आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

उंब्रज तसेच या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नोंद घ्यावी व पर्यायी मार्गाचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अजय गोरड यांनी केले आहे. या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

You might also like