ट्रॅक्टर रूतला : सातारा पालिकेकडून रस्त्यांची डागडुजी तीही निकृष्ठ दर्जाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पहायला मिळत आहे. शहरात दोन महिन्यापूर्वी गडबडीत रस्त्यांचे पॅचिंग करण्याचे काम केले. परंतु निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात ट्रॅक्टर रूतून बसला.

सातारा शहरात बऱ्याच दिवसांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील काही ठिकाणी अंतर्गत रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेने गडबड करत पॅचिंग करण्याचे काम सुरु केले. परंतु निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यातील कोटेश्वर मैदान परिसरातील रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आले होते. पण पहिल्याच पावसात या रस्त्यावर एक ट्रॅक्टर रस्त्यात रुतून बसला. बऱ्याच वेळानंतर ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आले.

नगरपालिकेच्या या निकृष्ठ दर्जाच्या डागडुजीच्या कामामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात  आहे. त्यामुळे नगर पालिकेकडुन रस्त्याच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी जनसामान्यांतुन होत आहे.

Leave a Comment