Viral Video : पुढे जेसीबी अन् मागे चारचाकी सराईत दरोडेखोरांच्या टोळीला फिल्मी स्टाईलने अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सुरत | Viral Video : गुजरातमधील सुरत या ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या एका सराईत टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. क्राईम ब्रँचने केलेली कारवाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिखलीघर टोळीतील सदस्यांना बारडोलीजवळ फिल्मी पद्धतीने अटक करण्यात आली आहे. चिखलीघर टोळीतील चोर दरोड्यात माहीर आहेत. त्यांना क्राईम ब्रँचने अतिशय प्लॅनिंग करून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. Viral Video

अशा प्रकारे केली अटक

सूरत पोलिसांना चोरांच्या मार्गाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी चारही बाजूंनी हल्ला केला. त्यांनी पळून जाऊ नये यासाठी प्रथम त्यांच्या चारचाकी गाडीची काच फोडली गेली. परंतु कारमध्ये बसलेल्या टोळीतील लोकांनी गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. कार थांबविण्यासाठी रस्त्यावर आधीच जेसीबी मशीन ठेवण्यात आलं होतं. यामुळे चोर तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना कार थेट जेसीबीला धडकली. Viral Video

यानंतर आरोपी चालकाने कार मागे वळवली. यावेळी क्राईम ब्रँचने मागे आपली गाडी उभा केली होती. यामुळे चोरांची कार जीपला धडकली. त्यानंतर तिथे जमलेल्या सगळ्यांनी लाठी-काठीने या चोरांच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीच्या काचा फोडल्या. यानंतर एकापाठोपाठ एक असे सर्व आरोपींना पकडण्यात आले. क्राईम ब्रँचने अगदी प्लॅनिंग करून फिल्मी स्टाईलने या सर्वांना अटक केली. या दरोडेखोरांसमोर पळ काढण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नव्हता. हि संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. Viral Video

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त रिटर्न !!!

इंग्लंडचा कर्णधार Eoin Morganची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

WhatsApp द्वारे Android फोनवरून टायपिंग न करता पाठवा मेसेज !!!

Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या

PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!! 

Leave a Comment