अहमदनगरमध्ये दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – दरोडा (Robbers attack) टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी चार आरोपींना पोलीस पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवर सातपीर बाबा दर्गा परिसरात आज पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या या थरारा दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यांवर दरोडेखोरांनी (Robbers attack) हल्ला केला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मयुर राजू ढगे, ईश्वर अशोक मोरे, रमेश वाकोडे आणि रणजित केशव कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तीन घरांवर दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते चोरटे
प्रमोद रत्नाकर भागवत हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडलगत असलेल्या सातपीर दर्गा परिसरात राहतात. ते त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन पाच दरोडेखोरांनी (Robbers attack) 4 जून रोजी पहाटे 3 च्या दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी सेक्युरिटीला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. यानंतर घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सुमारे 42 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिने चोरले. त्याचबरोबर त्यांच्या शेजारच्या दोन घरात दरोडा (Robbers attack) टाकला.

दरोडा टाकल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला गुप्त खबऱ्यामार्फत याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार महेश शेळके, आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक नदीम शेख, जालिंदर साखरे आदी पोलिस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. सिने स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना दरोडेखोराचा पोलिसावर हल्ला यावेळी एका दरोडेखोराने सत्तूरने पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. तरी देखील जिवाची पर्वा न करता पोलिस पथकाने चार दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले. दरोडेखोरांपैकी मयुर ढगे याने पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला असून त्याच्यावर नाशिक शहर येथे हत्येसारखे दहा गंभीर स्वरूपाचे व प्रॉपर्टी संबंधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

Leave a Comment