पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार ; सुदैवाने पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । फलटण तालुक्यातील दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले गावात घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. पण या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे असे गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लांडे हे गेल्या काही वर्षांपूर्वी फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आत्ता वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सिंघम सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सहकाऱ्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले असताना ही घटना घडली. ही घटना रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान सोमनाथ लांडे हे सहकाऱ्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या जबरी चोरीतील आरोपी संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्याना मिळाली होती. सह्हायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी यापूर्वी फलटण शहर पोलिस ठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण तालुक्यातील सर्वच भागाची चांगलीच माहिती त्यांना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment