शिराळा प्रतिनिधी । आनंदा सुतार
शिराळा येथील गुरुवार पेठेतील बंद घरातून चौदा तोळे सोने, चांदीचे दागीने तसेच रोख ४० हजार रुपये असा सहा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर विश्वासराव जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. शनिवारी सुधीर जाधव यांना दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळणार असल्याने, त्यांच्या पत्नी माया या पैसे नेण्यासाठी सायंकाळी सहाच्या दरम्यान घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता तिजोरी उघडी दिसली. कपाटातील दवाखान्याचे बिल भरण्यासाठी ठेवलेले रोख ४० हजार रुपये , सोन्याच्या बांगड्या , मंगळसूत्र , गंठण, अंगठी , चेन आदी जवळपास बारा तोळे सोने तसेच चांदीचे दागिने असा अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
यावेळी तातडीने पोलिसांना कळविले असता पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर , शिवाजी पाटील , महेश साळुंखे , विनोद पाटील , रणजित ठोमके यांनी घटनास्थळी भेट घेतली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा